शनिवार, ११ मे, २०१३


लिहू वाचू आनंदे…

आई या शब्दात आपल्या जीवनाचं रहस्य दडलेलं आहे. आईचा सहवास, माया, तिने बाल मनावर केलेले संस्कार, पटवून दिलेलं व्यायामाच महत्व, कोणत्याही कठीण प्रसंगी सामोरे जाण्यासाठी सक्षम केलेलं मन, इत्यादीचा अनुभव ज्यांनी घेतला आहे त्यांना आई या शब्दातील आपल्या जीवनाच दडलेलं रहस्य समजून येतं. असंच मी म्हणेन कारण आईने आपल्यासाठी, आपल्याला मोठं करण्याकरिता घेतलेले कष्ट आपण कधीच विसरू शकत नाही. फक्त आईचं आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आपल्याला ती नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवून जन्म देते. बाळाचा जन्म म्हणजे आईचा पुनर्जन्म. पुनर्जन्मानंतर ती बाळाला म्हणते, "खरंच, तू मला आई होण्याचं भाग्य दिलंस. हे भाग्य दिल्याची उतराई मी कशी करु ". त्यावेळी कळत नसूनही बाळ हसत, तेव्हा तिच्या आनंदाला भरती येते नी ती आई बाळाला आपलं दुध पाजून त्याला आणि स्वतःलाही तृप्त करते. अशा आपल्या आईला आपण कधीही दु:ख देवू नये वाईट बोलू नये आणि कधीही अंतर देवू नये कारण तिचे चांगले आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असतात म्हणूनच आपण आपल्या जीवनात यशस्वी होत असतो. सुखी जीवनाचा आनंद घेत असतो. याचा विचार आपण सर्वांनी निश्चितपणे करावयास हवा असे मला मनापासून वाटते. ( इथे मला आईची मुलं म्हणजे मुलगा - मुलगी अपेक्षित आहेत. ) कुठल्याही संकटाच्यावेळी आपल्या तोंडातून प्रथम शब्द " आई " येतो याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. अशा आपल्या प्रेमळ आईला निश्चितपणे सुखी करण्याचा, आनंद देण्याचा निश्चय करू या. या निश्चयातून आपल्याला सुखी आनंदी आणि सुंदर जीवन जगण्याची गुरुकिल्ली मिळणार आहे. आपण मिळविणार ना ही गुरुकिल्ली.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ०८०५२०१३.


लिहू वाचू आनंदे…

आपले जीवन आहे सुंदर
येणा-या आळसाला थारा
देवू नये कधीही जीवनात
झटका आळस काम करा

आपले जीवन आहे सुंदर
करुनी वाचन घ्या आनंद
होई वाचनानी सक्षम मन
अंतर्मनासही होईल आनंद

आपले जीवन आहे सुंदर
जोडाच मित्र बोलुनी गोड
नातं हे मैत्रीचं ठेवा जपून
जीवन होईल गोडच गोड

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे , १००५२०१३.

शुक्रवार, १० मे, २०१३


लिहू वाचू आनंदे…

आपले जीवन आहे सुंदर
येणा-या आळसाला थारा
देवू नये कधीही जीवनात
झटका आळस काम करा

आपले जीवन आहे सुंदर
करुनी वाचन घ्या आनंद
होई वाचनानी सक्षम मन
अंतर्मनासही होईल आनंद

आपले जीवन आहे सुंदर
जोडाच मित्र बोलुनी गोड
नातं हे मैत्रीचं ठेवा जपून
जीवन होईल गोडच गोड

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे , १००५२०१३.

बुधवार, ८ मे, २०१३


लिहू वाचू आनंदे…

आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. काहींशी आपली मैत्री होते कारण त्यांचे आपले विचार सारखे असतात. ज्या व्यक्तीचे विचार आपल्या विचारांशी जुळत नाहीत अशा व्यक्ती कालांतराने सहजपणे दूर झालेल्या दिसून येतात. मित्रत्वाच्या नात्यात हळूहळू प्रेमाच्या रेशीम गाठी बांधल्या जातात. इथे मला प्रियकर आणि प्रेयसीचे प्रेम अपेक्षीत नाहीये हे विचारात घ्या. अशी मैत्री झाली की आपण नियमित एकमेकांना भेट असतो. मौजमजेसाठी सहलीला जातो. या मैत्रीच्या नात्यातून सुंदर जीवनाचा लाभ आपण घेत असतो. या दरम्यान आपल्यात अनेक विषयावर साधक बाधक चर्चा होत असतात. अशा चर्चा होणे मला वाटते फार गरजेचे आहे, कारण प्रत्येकाचे शिक्षण, वयानुरूप जीवनात आलेले अनुभव, विचार करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. शंभर टक्के विचार कुणाचेच जुळत नाहीत. चर्चेमध्ये जी माहिती आपल्याला आपल्या मित्रांकडून मिळते त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. काही चांगल्या चालीरिती, काही रमणीय ठिकाणांची माहिती मिळते, आपल्या डोळ्यासमोर तिथे न जाताही चित्र उभे राहते नी आपल्या मनाला जो आनंद होतो समाधान लाभते. अशा चर्चेतून मिळणारे समाधान किंवा आनंद ज्याचा त्याने घ्यावयाचा असतो. कुठल्याही माध्यमातून विचारांची देवाण घेवाण व्हावी असे माझे प्रामाणिक मत आहे. म्हणूनच आपल्या आयुष्यात चांगले मित्र मैत्रिणी, नातेवाईक मिळाले तर त आपले भाग्य म्हणावे लागेल. माझ्या आयुष्यात मला चांगल शिक्षक, मित्र मैत्रिणी, नातेवाईक मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. आज माझे जीवन आनंदी समाधानी नी संमृद्ध आहे या बाबतीत आपल्याला काय वाटते. आपण काय सांगाल. हरी ओम.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ०४०५२०१३.


लिहू वाचू आनंदे…

आपलं जीवन सुंदर आहे. तर अशा सुंदर जीवनावर आपण मनापासून प्रेम करावयास हवं. आपण आपल्या जीवनावर जर मनापासून प्रेम केलं तर हे जीवनही आपल्यावर प्रेम करील. सर्वत्र प्रेम आणि प्रेमचं दिसून येईल. कटुता निघून जाईल आणि गोड सुंदर वातावरणात आपल्या सर्वांना मजेत राहता येईल. असे पहा, ज्यावेळी कुंभार मडक्याला सुंदर आकार देतो त्यावेळी मडके सुंदर दिसते. त्या मडक्याचे जीवन सुंदर बनते. कुणीही व्यक्ती त्या मडक्याला आपलंस करते घरी घेऊन जाते. सुदर मडक्यातील थंडगार पाणी प्यायल्यानंतर जेव्हा तहान भागते नी मनापासून समाधान होते त्यावेळीच त्या मडक्याचे जीवन सुंदर झालेले असते. कळत नकळत आपण त्या मातीच्या मडक्याचे कौतुक करून धन्यवाद देतो कारण मडक्यात पाणी थंडगार झालेले असते. आपल्या झालेले समाधान त्या कुंभारापर्यंत पोहोचते आणि त्याला आपले आशीर्वाद मिळाल्याचे समाधान लाभते. आपल्या जीवनाचे हे चक्र असेच चालू राहणार आहे. म्हणून दु:ख किंवा संकटांशी आनंदाने सामोरे जा. दु:ख, संकट जीवनातून निघून गेल्याचे आपणास जाणवेल. कारण त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदललेली असते. जीवनावर प्रेम केल्याने सुंदर जीवनाचा लाभ आपल्याल होईल आणि जीवन अधिकाधिक सुंदर करण्याकडे आपला प्रयत्न राहील. सुंदर जीवन. सुंदर जीवनावरील सुंदर प्रेम आपल्या जीवनात सुंदर क्षण आणील यात शंका नाही. जीवनावर प्रेम करून सुंदर जीवनाची अनुभूती घ्या. हरी ओम.

प्रदीप नरहरी केळकर…
ठाणे, ०४०५२०१३.

मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

वाचू आनंदे..

या विश्वात जे जे चांगले आहे ते सर्व पाहण्यासाठी ईश्वरांनी आपल्याला डोळे दिले आहेत. ऐकण्यासाठी कान, गंधित वासासाठी नाक आणि गोड गोड बोलण्यासाठी तोंड दिले आहे. आणि हो, पदार्थांची चव कळण्यासाठी जीभ दिलेली आहे. खरं तर याकरिता आपण ईश्वराचे, आपल्या आई वडिलांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. ज्या गोष्टी चांगल्या नाहीत वाईट आहेत त्यापासून दूर राहिले पाहिजे. कारण या वाईट गोष्टी आपल्या हिताच्या नाहीत. आपल्याला नक्कीच त्रास देणा-या आहेत. म्हणूनच या वाईट गोष्टी, वाईट प्रवृतींपासून दूर कसे राहता येईल हे पाहण्याची गरज आजमितीस आहे असे मला वाटते. हे सुंदर विश्व पाहण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचा उपयोग करून आपल्या हातून सत्कर्म कसे होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावयास हवे. अशी संधी आपल्याला वारंवार मिळत नसते. आपल्या हातून चांगले तेच घडावे. चांगल्या गोष्टी घडविल्यास या विश्वात सर्वत्र चांगलेच झाल्याचे दिसून येईल. सर्वजण सुखी, आनंदी होतील नाही का. चांगल्यांना हात द्या आणि वाईट प्रवृत्ती दूर करा.

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ३१०३२०१३.
लिहू - वाचू आनंदे...

येणा-या प्रत्येक क्षणाकडे...
आपलं काही मागणं आहे...

माझी बहिण धनश्री परांजपे यांच्या आजच्या चारोळीतील शेवटच्या दोन ओळी आहेत. या दोन ओळींनी खर पाहता माझं लक्ष वेधून घेतलं. तिचं म्हणणं खर आहे असे मला वाटते कारण आपल्याला आयुष्यात येणारे जे क्षण आहेत ते क्षण सुखाचे आनंदाचे आणि समाधानाचे असावेत ही अपेक्षा आहे. कदाचित त्यातील काही क्षण हे दुखाचेही येतील. पण या क्षणांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन स्वच्छ आई न्यायिक असेल तर या क्षणांकडून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखे आहे. आपली शिकण्याची तयारी मात्र हवी. सुखाच्या - आनंदाच्या क्षणी, सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवतांना त्यामध्ये आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक यांना सामील करून घ्या आणि आपला आनंद द्विगुणीत करा, वाटा म्हणजेच सुखाचे आनंदाचे क्षण अनुभवल्याचे समाधान सर्वांना मिळेल. या क्षणाकडून आपल्याला हे शिकावयास मिळते की एकमेकांबद्दलच्या आपुलकी, जिव्हाळा, प्रेमातून एकत्रित व्हा. एकत्रित राहण्यात सर्वांचा फायदा आहे, कुणीही शत्रू आपल्यावर चाल करून येणार नाही. ज्यावेळी दुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील त्यावेळीही आपल्या दुखात सर्वांना सहभागी करून घेण्याने आपले दु:ख कमी होईल. झालेले दु:ख सहन करण्याची ताकद आपल्याला मिळेल. या दुखाच्या क्षणात आपल्याला असे अनुभवास मिळते की आपण एकटे नसून सर्वजण आपल्यासोबत आहेत. यातून नक्कीच मार्ग काढता येईल. यासाठी येणा-या प्रत्येक क्षणाकडे एकच मागणे मागावे की तुझ्या सुख दु:ख, आनंद या क्षणांतून आम्हाला एकत्रित होण्याची बुद्धी दे. एकत्रित झाल्याने आमची ताकद ओळखून कुणीही शत्रू चाल करून येणार नाही. आम्हाला सुखाचे आनंदाचे आणि दुखाचे क्षण एकत्रित अनुभवत येतील. हरी ओम.

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०८०४२०१३.