ईश्वर प्रार्थना...
सप्रेम नमस्कार - आशीर्वाद विनंती विशेष,
आपल्या लहानपणी आपल्या आईने आपल्या बालमनावर चांगले संस्कार केलेले आहेत. त्या कारणे आपले मन आणि अंतर्मनही सशक्त, सक्षम झालेले आहे. जर आपल्या बालमनावर संस्कार झाले नसते तर मन, अंतर्मन दुबळे झाले असते. चांगले विचार मनामध्ये कधीही आले नसते आणि आपला जीवन प्रवास भरकट गेला असता. आज आपण आपल्या आयुष्यात या संस्कारामुळे स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे आहोत असे मला वाटते. आपल्या आयुष्यात आपल्याला दु:ख, त्रास, समस्या आणि संकटे यांच्याशी सामना करावा लागतो कमी अधिक प्रमाणात. हे सत्य नाकारता येणार नाही. दु:ख, त्रास, समस्या, संकटे यांच्याशी सामना करीत असतांना संस्कारक्षम मन शेवटी आपल्या परम पूज्य ईश्वरचरणी लीन होते. संस्कारक्षम मनाला ईश्वराचा एकमेव आधार असतो. अशा वेळी आपण या सर्वांवर मात करण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो. आपला ईश्वरावर विश्वास असतो की दु:ख, त्रास, समस्या, संकटे आपला ईश्वर निश्चित कमी करील, दूर करील. हा ईश्वरावरील विश्वास, आपण केलेली प्रार्थना फलद्रूप होऊन आपल्याला झालेले दु:ख, त्रास, उद्भवलेल्या समस्या आणि संकटे आपल्या जीवनातून पळून जातात. म्हणून आपण नेहमी आपल्या लाडक्या ईश्वरासोबत रहावे. त्याच्या कृपाप्रसादासाठी नित्य नियमित प्रार्थना करून जे जे वाईट आहे आणि त्यावर मात करण्यासाठीचे बळ ईश्वराकडे मागितले पाहिजे असे माझे मत आहे. प्रत्येक व्यक्तिगत मते वेगवेगळी असू शकतात कारण शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. मला जे वाटले किंवा माझे मत आपल्या समोर मांडले. आपण जरूर विचार करावा. अनुभूती घ्यावी.
प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, २९१०२०१२.