बुधवार, ८ मे, २०१३


लिहू वाचू आनंदे…

आपलं जीवन सुंदर आहे. तर अशा सुंदर जीवनावर आपण मनापासून प्रेम करावयास हवं. आपण आपल्या जीवनावर जर मनापासून प्रेम केलं तर हे जीवनही आपल्यावर प्रेम करील. सर्वत्र प्रेम आणि प्रेमचं दिसून येईल. कटुता निघून जाईल आणि गोड सुंदर वातावरणात आपल्या सर्वांना मजेत राहता येईल. असे पहा, ज्यावेळी कुंभार मडक्याला सुंदर आकार देतो त्यावेळी मडके सुंदर दिसते. त्या मडक्याचे जीवन सुंदर बनते. कुणीही व्यक्ती त्या मडक्याला आपलंस करते घरी घेऊन जाते. सुदर मडक्यातील थंडगार पाणी प्यायल्यानंतर जेव्हा तहान भागते नी मनापासून समाधान होते त्यावेळीच त्या मडक्याचे जीवन सुंदर झालेले असते. कळत नकळत आपण त्या मातीच्या मडक्याचे कौतुक करून धन्यवाद देतो कारण मडक्यात पाणी थंडगार झालेले असते. आपल्या झालेले समाधान त्या कुंभारापर्यंत पोहोचते आणि त्याला आपले आशीर्वाद मिळाल्याचे समाधान लाभते. आपल्या जीवनाचे हे चक्र असेच चालू राहणार आहे. म्हणून दु:ख किंवा संकटांशी आनंदाने सामोरे जा. दु:ख, संकट जीवनातून निघून गेल्याचे आपणास जाणवेल. कारण त्याकडे पाहण्याची आपली दृष्टी बदललेली असते. जीवनावर प्रेम केल्याने सुंदर जीवनाचा लाभ आपल्याल होईल आणि जीवन अधिकाधिक सुंदर करण्याकडे आपला प्रयत्न राहील. सुंदर जीवन. सुंदर जीवनावरील सुंदर प्रेम आपल्या जीवनात सुंदर क्षण आणील यात शंका नाही. जीवनावर प्रेम करून सुंदर जीवनाची अनुभूती घ्या. हरी ओम.

प्रदीप नरहरी केळकर…
ठाणे, ०४०५२०१३.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा