गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

सुख दु:ख 

नकळत माझ्या दारी आले दु:ख...
विचारलं मला मी येवू का घरात...
म्हटलं ये घेऊन माझ्या सुखाला...
तरंच स्वागत होईल तुझे घरात...!!

सुखाला तुझ्याविना नाही मोल...
कळते सुखाचे मोल त्या दु:खात...
नातं सुख दु:खाचं जीवनी हवंच...
ठेऊनी घ्या सुख दु:खाला घरात...!!

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ३००८२१०.

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१२

कवितेची चोरी...
सुंदर कवितेची होत असते चोरी...
आवडली म्हणून करावी का चोरी...
काही मिळत नाही ना करुनी चोरी...
कशाला बर करावी कवितेची चोरी...

दरवळणा-या सुगंधाची करा चोरी...
नाही करता येणार सुगंधाची चोरी...
करू नकाचं कुकर्म नका करू चोरी...
सत्कर्मांची करा आवर्जून हो चोरी...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, २५०८२०१२.



आत्मा 



घेतलंय शरीर माझ्या आत्म्यानं भाड्यानं...
घेण्या प्रायचीत्त मागील जन्मातील पापाचं...
भोगायची दु:ख नी येणारी संकटं या जन्मी...
सोडील शरीर माझं होता परिमार्जन पापाचं...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे...
२६.०८.२०१२


गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१२

तुझ्या शब्दांनी...

तुझ्या शब्दांनी मला दाखविली दिशा...
शब्दात न गुरफटता शब्दचं फुलवावे...
घालावी रांगोळी शब्दांचीचं कागदावर...
अगदी सहज शब्द शब्दांवर प्रेम करावे...

प्रदीप नरहरि केळकर...
सुंदर जीवन ....या फुलाप्रमाणे बहरलेले........



मैफिल 
चिमुकल्या प्रेमळ सुंदर पक्षांची...
मैफिल जमली आहे पानोठ्यावर...
करण्या साजरा आजचा शुभ दिन...
विर्जण न पडो त्यांच्या आनंदावर...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ३१०७२०१२.
 

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१२

मनाची श्रीमंती

असली गरिबी ठेवावी मनाची श्रीमंती...
असता एक भाकरी उदार मनानं द्यावी...
अर्धी भाकर भुकेल्यास स्वानंदे करुनी...
रोजभाकर तुकड्याची सवय न लावावी...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, २२०८२०१२.

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२


सुविचार...
चेहरा कितीही सुंदर असला तरीही मन सुंदर असावयास हवे. जर मन शुद्ध नसेल तर त्या सुंदर चेह-याचा काय उपयोग. म्हणून सुंदर पवित्र आणि शुद्ध मन ठेवा. ते मन स्वतःला आणि आपल्या जवळच्या मित्र परिवारास, नातेसंबंधितांना आनंदित, समाधानी ठेवेल. यातूनच ईश्वरी कृपेची अनुभती घ्या आणि ती निश्चित मिळेल याची खात्री बाळगा..

प्रदीप नरहरि केळकर...

ठाणे, ०४०८२०१२.
क्षण...
पाहू नका गेलेल्या क्षणांकडे...
येणारचं नाहीत ते क्षण परत...
वर्तमानातील क्षण जरूर पहा...
तेच करती सुख दु:खात सोबत... !!

पाहू नका भविष्यातील क्षणांकडे...

करू नका चिंता येणा-या क्षणांची...
ते क्षण आहेत जीवनातील स्नेही...
वर्तमानात होईल वाटचाल सुखाची... !!

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे ०३०८२०१२.

प्रिती पुष्पे 
ओंजळीत माझ्या दिलीस भरभरून प्रिती पुष्पे...
तुझ्या गाढ विश्वासाची माझ्यावरील प्रितीमुळे...                                                      
माझ्या ओंजळीतील पुष्पे रहातीलचं टवटवीत...
आनंदानी हसत खेळत तुझ्या माझ्या प्रितीमुळे...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे,
 
वाटायचं नसतं दु:खं

वाटायचंच नसतं दु:ख व्हायचं सहभागी...
नये बसू या दु:खाला कवटाळून कोणीही...
दु:खाच्या वाटचालीत येतंय सुख मागून...
आलं सुख की आनंदानी वाटावं सर्वानाही...

वाटायचेच नसतात शब्द वाटायचे विचार...
नये बसू शब्दांनाचं पकडून कोणी कधीही...
विचार आपले मित्र देतील नक्की सोबत...
सुंदर विचारांनी होईल आपलं मन सुखीही...

प्रदीप नरहरि केळकर...
 एकच संधी 
  
 कापायचं असतं कापड घेऊनी माप...
कापण्यापूर्वी विचार करावयास हवाचं
खरंच येईल घेता माप कितीही वेळा...
कापण्या कापड मिळते संधी एकदाचं...

आपणासी बोलायचं असतं खूप काही...
बोलण्यापूर्वी विचार करावयास हवाचं...
खरंच येईल की बोलता कितीही तास...
योग्य बोलण्याची मिळते संधी एकदाचं...

प्रदीप नरहरि केळकर...