शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

इंद्रधनुष्य
पावसाळ्यात अनेकदा इंद्रधनुष्य पहावयास मिळतं. एक नयन मनोहारी दृश्य. आपल्या डोळ्यात साठवून ठेवावं. इंद्रधनुष्याचे सप्त रंग आपल्या जीवनाशी निगडीत असतात. खर सांगायचं म्हणजे सुख, दु:ख, आनंद, समाधान, प्रेम, आपुलकी आणि कदाचित कोमलता इत्यादी भाव भावना त्यामध्ये असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपले जीवन हे विविध छटांनी भरलेले आहे. त्याचा आस्वाद घेतल्यास आपणास इंद्रधनुष्यातील रंगांची प्रचिती येईल. इंद्रधनुष्यांतील मनमोहक रंग आपणास जीवनातील अनेक गोष्टी सांगून जातात. पावसाला म्हटला की, सृष्टी हिरवीगार सुंदर, काहीशी हवीहवीशी, बोचरी असल्याचे आपणास जाणवते आणि मनात सुंदर विचार येतात. कविमनाच्या कवीला सुंदर रचनाही सुचतात याच पावसाळ्यात.  माझी बहिण वर्षा चौगुले तिच्या " खास " या कवितेत म्हणते, " आपल्या भेटीतले तुझे शब्द, ते सदैव.....माझ्याबरोबर, आणि हिरवगार मन माझं, ते मात्र तुझ्याबरोबर.." दुस-या एका " तू " या कवितेत आपल्या प्रियकराला म्हणते " तू ढग त्या रिमझिम पावसाचा, तू रंग त्या दुर्मिळ इंद्रधनुष्याचा." या विश्वातील प्रत्येक व्यक्ती ही मनाने कलाकार आहे. मात्र प्रत्येक कलाकाराच्या अंगी असलेली कला या वर्षा ऋतूत फुलून बहरून येते. सर्वांना आवडणारा हा पावसाला ऋतू जीवनाला एक वेगळी कलाटणी देवूनी जातो असे म्हटल्यास चुकीचे ठरणार असे माझे मत आहे. पटतंय ना आपल्याला.


प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०६०९२०१२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा