शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१२

येईल का दाखविता


येईल का दाखविता तुला ग...
माझ्यावरील तुझे गाढ प्रेम...
नाही येणार दाखविता तुला...
मला अनुभवावं लागेल प्रेम...

येईल का रे सुगंध दाखविता...
त्या सुंदर टवटवीत फुलांचा...
नाही येणार दाखविता तुला...
वासाने कळवा गंध फुलांचा...

येईल का ग तृप्ती दाखविता...
मनाला होणा-या आनंदाची...
नाही येणार दाखविता तुला...
अनुभूती घ्यावी त्या तृप्तीची...

प्रदीप नरहरि केळकर...
ठाणे, ०७०९२०१२.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा